Uncategorized

मालक भासवून बेकायदेशीर दस्तची नोंदणी; बारा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल,दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार

अंबाजोगाई जमिनीचा मूळ मालक आहे असे भासवून अनोळखी व्यक्तीस दुय्यम निबंधक यांच्या समोर उभा करून बेकायदेशीरपणे दस्त नोंदणी केल्याप्रकरणी बारा जणांविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

येथील यासीन आयुब शेख ( वय: २३) हे आपली आई मेहरुन्निसा आयुब शेख ही आजारी असल्या कारणाने हातकणंगले जि. कोल्हापूर येथे राहतात. त्यांच्या आईच्या नावे तालुक्यातील बर्दापुर येथे गट क्रमांक १७२ मध्ये जमीन आहे. आई आजारी असल्या कारणाने ते दोघेही अंबाजोगाई किंवा बर्दापूर येथे आले नाहीत. हे दोघेही दूर असल्याचा गैरफायदा घेत अनु. क्र. ३७७१/ २०२१ अन्वये बनावट बोगस हक्कसोडपत्र आरोपी मोहम्मद गौस आमिर हमजा शेख याने स्वतःच्या हक्कात व मालक मेहरुन्निसा शेख यांच्या गैरहजेरीत व वडिलोपार्जित मिळकत पासून कायमचे बेदखल करण्याच्या उद्देशाने दुय्यम निबंधक कार्यालयात मेहरुन्निसा शेख यांच्या जागी अनोळखी स्त्री उभी करून दुय्यम निबंधक यांना अनोळखी स्त्री हीच मेहरून्निसा शेख आहे असे भासवून दुय्यम निबंधक यांची दिशाभूल करून व सर्व आरोपीने संगणमत करून सदरचा दस्त बेकायदेशीरपणे नोंदणीकृत करून घेतला. याप्रकरणी मेहरून्निसा शेख यांचा मुलगा यासीन आयुब शेख यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद गोस आमिर हमजा शेख, जरीन बेगत अमीर हमजा, शहाना भर बासूमिया शेख, अत्सिा शफीक पठाण, नफिसाबी सादेख शेख, तबस्सुम हमीदखा, नौशाद मुस्तफा इनामदार, शमशादबेगत सादीकअली सय्यद, तैमुम बाशीद शेख, बाबूमियाँ शेख, मैनु रशीद शेख व एस एस भातलवंडे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुरनं ४५८/ २०२१ कलम ४२०, ४०६, ४६७, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे या करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!