बीड(प्रतिनिधी):- बीड शहरामध्ये भाजपा, बीएसपी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रपणे येऊन सामाजिक ऐक्य जपत भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष यशवंतराव(भैय्यासाहेब) आंबेडकर आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी केली आहे. यामुळे बीड शहरात प्रथमच नवा पायंडा पडला असून सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला आहे.
शहरातील नगर रोड लगत असलेल्या आंबेडकर चौकामध्ये आज दिनांक 12 डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात आली. बीड शहरामध्ये प्रथमच अशा रीतीने दोन महापुरुषांची जयंती एकत्रितरीत्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून साजरी केली आहे. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या जयघोषाने ही जयंती साजरी झाली यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे,भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ढाकणे, अजय सवाई बसपाचे कार्यकर्ते अनिल बोराडे, मनोज बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गौतम मोरे अमोल पारवे अजिंक्य पांडव, शिवसेनेचे प्रमोद शिंदे, मुन्ना गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अभय मगरे, कैलास वीर, राजू वारभूवन, विजय सोनवणे, अजय घोडके, विक्रांत हजारी, बालाजी पवार, भाजपा महिला पदाधिकारी छायाताई मिसाळ,संग्राम बांगर,अमर सानप,कपिल सौदा,विशाल खाडे,समर्थ तांदळे,पत्रकार संजय धुरंधरे यांच्यासह सर्व पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.