सिरसाळा येथील घटना
सिरसाळा न्यूज : जमिनीच्या आर्थीक वादातून एका ८० वर्षीय वृद्धाचा खून झाल्याची घटना सिरसाळ्यात घडल्याचे वृत्त आहे.ह्या खून प्रकरणात आठ वर्षा पुर्वी विलास ढेंबरे खून प्रकरणातील आरोपी महादेव पोटे यावर नातेवाईकांनी सशंय व्यक्त केला आहे.
या विषयी समजलेल्या माहिती नुसार, हरिभाऊ नामदेव ढेंबरे वय ८० यांचे प्रेत पोहनेर रोड शेतीशिवारात दिनांक ८ रोजी सायंकाळी जखमी अवस्थेत आढळून आले, नातेवाईकांनी दवाखान्यात नेले तेंव्हा समजले कि, ढेंबरे मयत झाले आहेत. सिरसाळा पोलिस प्रशासनाला हि बाब समजल्या नंतर मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई शासकिय दवाखाण्यात पाठवण्यात आले, ढेंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याचे समजते आहे. हा खून महादेव पोटे ( रा.पारगाव ता.माजलगाव) यानेच केला असल्याचा संशय नातेवाईकांनी केला असल्याचे समजते आहे . महादेव पोटे आणि ढेंबरे कुटुंबात जमिनी बाबत आर्थीक देवान घेवानीचा वाद होता.आठ वर्षा पुर्वी जमिनीच्या आर्थीक कारणातूनच हरिभाऊ नामदेव ढेंबरे यांचा मुलगा विलास हरिभाऊ ढेंबरे याचा शेतात ६ जून २०१४ साली महादेव पोटे याने लोखंडी
खो-याने डोक्यात वार करुन खून केल्याचा गुन्हा पोलिस स्टेशन येथे दाखल आहे. विलास खुन प्रकरणी महादेव पोटेची दिनांक ७ रोजी अंबाजोगाई अप्पर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.मनात अजून राग असल्याने महादेव पोटे याने बाहेर येताच हरिभाऊ ढेंबरेचा खून केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असल्याचे समजते आहे. ह्या प्रकरणी पोलिस अधिक तपास करतच आहेत. मयत हरिभाऊ ढेंबरे यांचे अंत्यसंस्कार नातेवाईकांनी केले आहेत. रात्री उशिरा पर्यंत त्यांचा मुलगा कैलास हरिभाऊ ढेंबरे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.दरम्यान सिरसाळा गावात व परिसरात ह्या घटनेने खळबळ उडाली आहे. आठ दिवसां पुर्वीच हद्दीत एक खून झाल्याची घटना ताजी असतांना दुसरी हि घटना लागोपाट घडल्याने दहशतीचे वातावरण आहे.
●भक्कम पुराव्या अभावी पोटे खून खटल्यातून निर्दोष :
दिनांक ६ जून २०१४ रोजी वार गुरुवार सकाळी ढेंबरे यांच्या शेतात हरिभाऊ ढेंबरे यांचा मुलगा विलास ढेंबरे खून झाला होता. ह्या प्रकरणी विलासचे वडिल हरिभाऊ ढेंबरे याच्या फिर्यादी वरुन सिरसाळा पोलिस स्टेशन येथे आरोपी महादेव कान्होबा पोटे यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंरतु भक्कम पुराव्या अभावी मंगळवारी दिनांक ७ रोजी अंबाजोगाई अप्पर न्यायालयाने महादेव पोटे याची निर्दोष मुक्तता केली आहे. ह्या खून प्रकरणातील आरोपी महादेव पोटे यावरच नातेवाईकांनी हरिभाऊ यांच्या खुनाचा संशय व्यक्त केला असल्याचे समजते आहे. नातेवाईक जरी पोटे वर आरोप करत असले तरी खरा आरोपी कोण आहे याचा तपास सिरसाळा पोलिस नक्किच करतील.