Uncategorized

लोकनेत्याच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन,शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन,रक्तदान करून गरजू रूग्णांना द्या मदतीचा हात

परळी । दिनांक ०९।
लोकेनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त येत्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून गरजू रूग्णांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि श्रीमान रामभाई शाह ब्लड बॅक बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वा. दरम्यान गोपीनाथ गडावर रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गोरगरीब रुग्णांना दुर्धर आजारात रक्ताची गरज भासते, अशा वेळेस रक्तदान शिबीरातून झालेल्या रक्तदानाचा त्यांना उपयोग होतो, रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान केल्यास त्याचा उपयोग गरजू रूग्णांना होणार आहे. या शिबिरात इच्छूकांना त्यांचा रक्तगटही तपासता येणार आहे. रक्तदानासारख्या महान कार्यात हातभार लावून शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!