माजलगाव, दि. 8 (लोकाशा न्यूज) : शहरातील नविन बसस्थानकासमोर असलेल्या पुर्णवादी बँकेतुन मालकाची पाच लाखाची कँश घेवून जातांना मोटरसायकलच्या हँडलला आडकवलेली बँग अज्ञात दोन चोरट्यांनी पळविल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली असुन व्यापार्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरात गत आठवड्यातच दरोडा पडल्यानंतर पुन्हा चोरटे सक्रीय झाले असून बुधवारी येथील व्यापारी संतोष दुगड यांचा मुनिम रत्नेश्वर तुकाराम डिग्रसकर(55) हे नेहमी प्रमाणे त्यांच्या दुकानाची कँश आणण्यासाठी दोन लाख व तीन लाख असे दोन चेक घेवून मोटरसायकल क्र.एम.एच.44व्ही 9627 वर नविन बसस्थानका समोरील पुर्णवादी बँकेत गेला होते.बाजार दिवस असल्याने बँकेत गर्दी होती.या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांना कँश घेतांना बघुन त्यांच्यावर पाळत ठेवत होते. डिग्रसकर हे कँश बँग घेवून पार्कींग मध्ये आले व त्यांनी बँग गाडीच्या हँडलला अडकुन चावी काढत असतांना त्यांच्या खिशातील चिल्लर पैसे पडल्याचे त्यांना ओळखिच्या व्यक्तीने सांगितल्याने ते पैसे घेण्यास वाकले असता अज्ञात दोघा पंचविस वर्षीय चोरट्यांनी त्यांची कँश बँग हिसका मारुन पळविली. हे दोघे चोरटे मोटरसायकलवर बसून पसार झाले असून या प्रकरणी शहर पोलीसात रत्नेश्वर डिग्रसकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या प्रकारा मुळे व्यापार्यांसह नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे.