बीड

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; बीडममध्ये बस चालकाने घेतले विष, जिल्हा रुग्णालयात दाखल

बीड:- एस टी महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळला आहे. बीड येथे संपकरी वाहकाने रोगर घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यभर संप सुरू आहे.ऐन दिवाळीच्या काळात हा संप सुरू असल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.काही ठिकाणी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने राज्यभर वातावरण चिघळले आहे. दरम्यान बीड येथे संपकरी वाहक अशोक कोकटवार यांनी रोगर पिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!