धारूर, 4 .
धारूर माजलगाव व वडवणी तालूक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हातचे पुर्णपणे खरीप पिक गेलेले असताना महसुल प्रशासनाने ५० टक्के पेक्षा जास्त अणेवारी चुकीची दिली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे,आनेवारी तात्काळ दुरूस्त करून फायनल अहवाल द्या, असे आदेश आ. प्रकाश सोळंके यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
यावर्षी कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे हातचे खरीपाचे पुर्ण पिक गेले आहे.गेल्या चाळीस वर्षातील सर्वांत मोठी हि अतिवृष्टी असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन हे तर पुर्ण हातचे गेले आहे. हि गंभिर परीस्थीती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, विशेष म्हणजे महसूल प्रशासनाने माजलगाव , धारूर, वडवणी तिन हि तालूक्यातील अणेवारी पन्नास टक्के पेक्षा जास्त देऊन चुकीची माहीती दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार असून या चुकीचे माहीती मुळे शासनाच्या मदती पासून शेतकरी वंचित राहाणार आहेत. प्रशासनाच्या या धोरणाला आ. प्रकाश सोळंके यांनी तीव्र विरोध केला आहे, त्यानुसार आनेवारी तात्काळ दुरूस्त करून फायनल अहवाल द्या, असे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता सुधारित आणेवारीत नेमके काय काय आणि कसे कसे बद्दल होतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.