बीड, जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका शेतकऱ्यांच्या कामी येणार आहे, नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने 10 टक्के रॅन्डम सॅम्पल सर्वे करा , असे आदेश जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी विमा कंपनीला दिले आहेत.
जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक दि .30.09.2021 चे इतिवृत्त क्र . यापूर्वी आपणास संदर्भीय पत्र क 1 ते 5 अन्वये प्रधानमंत्री पिक विमा योजना 2021 स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान ( Localized calamities ) प्राप्त पुर्वसुचनांचे यादृच्छिक पध्दतीने संम्पल सर्वे करणेबाबत सुचित करण्यात आले होते . संदर्भ .5 नुसार आपण आपल्या पत्रात सर्वेक्षणाचे प्रमाण कमी करुन 10 टक्के रेन्डम सॅम्पल सर्वे करण्याबाबत दिलेल्या पत्रावर दि 30/09/2021 रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीने – ‘ भारतीय विमा कंपनी कडुन कोणत्याही कायदेशीर बाबी पुढे करण्यात येणार नाहीत . तसेच उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबीची जबाबदारी भारतीय कृषि विमा कंपनीची असेल – या अटीवर मान्यता दिली आहे . त्यामुळे आपण पुर्वसुचनांचे लवकरात लवकर 10 टक्के यादृच्छिक पध्दतीने तालुका कृषी अधिकरी यांच्याशी समन्वय ठेवून सॅम्पल सर्वे विहीत वेळेत पुर्ण करावेत . समितीच्या निर्देशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करावी , असे आदेश जिल्ह्याधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी विमा कंपनीला दिले आहेत.