Uncategorized

बीडमध्ये उद्या राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साधणार कार्यकर्त्यांशी संवाद, राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत सहभागी व्हा -आ.संदिप क्षीरसागर


बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा मंगळवारी बीडमध्ये येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या संवाद यात्रेला बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवार दि.28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बीडमध्ये येत आहेत. राष्ट्रवादी भवन बार्शी रोड,बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांशी ते संवाद साधणार आहेत. हा संवाद मेळावा राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे  राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे नेते बीडचे पक्ष निरीक्षक जीवन गोरे, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, अ‍ॅड.डी.बी.बागल, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने बीड मतदार संघातील पक्ष संघटनेचा आढावा घेवून पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड मतदार संघाच्या विकासासाठी जयंत पाटील घेणार प्रशासकीय बैठक
बीड मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बीड शहरातील बिंदूसरा नदीवरील बंधारा कम पुल, तसेच खांडे पारगाव टुकुर प्रकल्प येथील साठवण तलावाऐवजी नदी पात्रात चार निम्न पातळी बंधारे घेणे व शिवणी प्रकल्पाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे अतिरीक्त पाणी जरूड प्रकल्पात सोडण्याच्या कामास विशेष बाब म्हणून मंजूरी अशा महत्त्वाच्या विषयावर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या विनंतीवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेवून बीड मतदार संघासाठी झुकतं माप देतील असं दिसत आहे. या बैठकीला जलसंपदा विभागातील विविधस्तरातील अधिकार्‍यांची उपस्थित असणार आहे.

बीड शहर राष्ट्रवादीमय
बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रूपालीताई चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशावरील नेते मंडळी संवाद यात्रेच्या निमित्ताने बीडमध्ये येत असल्याने बीड शहरात लावलेले झेंडे, बॅनर यामुळे बीड शहर राष्ट्रवादीमय झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!