Uncategorized

विमा कंपनीच्या कामावर कलेक्टरांनी व्यक्त केली तिव्र नाराजी, जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान, नुकसान भरपाई निश्‍चित करण्यासाठी आता तात्काळ रॅण्डम सॅम्पल सर्वे करा, कलेक्टरांचे विमा कंपनीला आदेश


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पीके पुर्णपणे उद्वस्थ झाली आहेत. याअनुषंगाने ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन विमा कंपनीने केले होते. त्यानुसार विमा कंंपनीकडे तब्बल दोन लाख अर्ज आले आहेत. असे असले तरी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मात्र विमा कंपनीच्या कामावर तिव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. कारण सातत्याने सुचना देवूनही पीकांचे सर्वेक्षण झाले नसल्याचे विमा कंपनीला दिलेल्या पत्रात कलेक्टरांनी म्हटले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता नुकसान भरपाई निश्‍चित करण्यासाठी रॅण्डम सॅम्पल सर्वे करा, असे स्पष्ट आदेश शर्मा यांनी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहेत.
भारतीय कृषि विमा कंपनीस प्राप्त पुर्व सुचनांची 10 दिवसात सर्वेक्षण करणे बंधनकारक आहे, विमा कंपनीने 10 दिवसाचा कालावधी उलटुनही सर्वेक्षण पार पाडलंलं नाही, प्राप्त पुर्वसुचनांच्या क्षेत्राची आजवर माहिती दिलेली नाही. पुर्वसुचना देण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेल्या उीेि खर्पीीीरपलश Aिि , टोल फी.क्र. ई – मेल यात तांत्रिक अडचणी उद्भवल्याचे दिसुन आले. रब्बी पिकासाठी शेतकर्‍यांना बाधित क्षेत्र पूर्वमशागत करत तयार करणे तातडीचे बनलेले आहे. विमा कंपनीच्या सर्वेक्षणाची गती अत्यंत संथ आहे, तसेच प्रत्येक कि किमान 25 टक्के क्षेत्र बाधित झालेले आहे. त्याअर्थी जिल्हास्तरीय संयुक्त समितीने दि.23 सप्टेंबर 2021 च्या बैठकीत  कृषि आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सुचना दि. 23 ऑगस्ट 2021 च्या अनुषंगाने यादृच्छिक ( ठरपवरा ) सॅम्पल सर्वेक्षण करून पूर्वसूचनांचे सर्वेक्षणाबाबत आपणास निर्देश दिलेले आहेत. तरी भारतीय कृषि विमा कंपनीने दि.23 सप्टेंबर 2021 च्या जिल्हास्तरीय समितीच्या इतिवृत्तानुसार व संदर्भाकीत कार्यपध्दतीचे पालन करुन तालुका कृषि अधिकार्‍यांशी समन्वय साधून रॅण्डम  सॅम्पल सर्र्वे करावेत, समितीच्या निर्देशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!