बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : मागच्या एक महिण्यांपुर्वीच सीईओ अजित पवार हे बीड जिल्ह्यात रूजू झाले आहेत. जिल्ह्यात रूजू होताच त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कामांना गती दिली आहे. विशेष म्हणजे एकही फाईल पेंडीग राहणार नाही, याची काळजी ते स्वत: घेत आहेत. त्याअनुषंगानेच झेडपीत आलेल्या प्रत्येक फाईलींचा सीईओंकडून तात्काळ निपटारा होताना पहायला मिळत आहे. दरम्यान जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांना त्यांनी भेटी देवून त्या त्या तालुक्यातील कामांचा आढावा घेतला असून संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांनी प्रत्येक कामाला गती द्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिलेले आहेत.
कामे गतीने केली तर त्याचा फायदा सर्वांनाच होतो, विशेष म्हणजे विकास कामांनाही गती मिळते, अगदी हाच दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून सीईओ अजित पवार हे काम करीत आहेत. टेबलवर फाईली पडून राहणार नाहीत, आलेल्या फाईलींचा तात्काळ निपटारा करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी झेडपीच्या सर्वच विभाग प्रमुखांना दिलेले आहेत. त्यानुसार सर्व विभाग प्रमुख कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे स्वत:कडे आलेल्या फाईलींवरही तात्काळ स्वाक्षरी करून त्या फाईलींचा सीईओ निपटारा करत आहेत. यामुळेच झेडपीत येणार्या सर्व सामान्यांची कामे तात्काळ होत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील विकास कामांनाही गती मिळत आहे.