Uncategorized

दंड भरण्यासाठी वाहनधारकांना काढल्या तीन हजार नोटीसा, दंड न भरल्यास जिल्ह्यातील वाहनधारकांना 25 सप्टेंबर रोजी न्यायालयीन कारवाईला तोंड द्यावे लागणार



बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : बीड पोलीस दला अंतर्गत वाहतूक शाखा व 28 पोलीस ठाणे तर्फे वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकावर ई चलन प्रणली व्दारे कारवाई करण्यात येते, सदर ई चलान प्रणालीब्दारे कारवाई केलेल्या वाहनधारकांना एस.एम.एस.व्दयारे सदर चलनाची तडजोड रक्कम भरण्याबाबत सुचना देण्यात येतात. सुचना देउन देखील वाहन धारकांनी ई चलनांच दंडाची रक्कम अद्यापपर्यंत तडजोड रक्कमेचा भरणा केलेला नाही.अशा वाहन धारकांना पुन्हा संधी देण्यासाठी अपर पोलीस महासंचालक ( वाहतूक ) म.रा.मुंबई कार्यालयाकडुन एस.एम.एस.व्दयारे संदेश पाठवुन प्रलंबित दंड भरणे बाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , बीड व पोलीस निरीक्षक वाहतूक व पो.स्टे प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत वाहन चालकांना प्रलंबित दंड भरण्याबाबत 3000 नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. दि. 21 सप्टेंबर 2021 ते दि. 24 सप्टेंबर 2021 पर्यंत  अनपेड ई चलनाव्दारे भरण्यासाठी दिलेल्या अवधीमध्ये दिलेल्या ठिकाणी भरणा करता येईल, सदर अवधीमध्ये वाहनधारकांनी तडजोड रक्कमेचा भरणा न केल्यास त्यांना प्राप्त झालेल्या एस.एम.एस.मा.न्यायालय नोटीस प्रमाणे दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी 10:00 वाजता मा.जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे लोक अदालतमध्ये हजर राहावे लागणार आहे.  रोख स्वरुपात पेंडिग ई चलानाचा भारणा करण्याकरीता पोलीस अधीक्षक कार्यालय , वाहतूक शाखा , बीड व बीड जिल्यातील सर्व पोलीस ठाणे येथे दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर रक्कम ही डेबीट कार्ड क्रेडीट कार्ड , ब्दारे घेण्यात येईल. पेटीएम अ‍ॅप मध्ये ई चलान वर जाउन दंडाची रक्कम भरता येते. चलान केल्याच्या नंतर समोरील व्यक्तीला गेलेल्या मॅसेजमधील लिंक वर टच करून दंडाचा भरणा करता येतो. महा ट्राफीक अ‍ॅप मोबाईल मध्ये इन्टोल करुन दंडाचा भरणा करता येतो. चरहरींीरषषळल.शलरश्रश्ररप.र्सेीं.ळप या वेबसाईड वर दंडाचा भरणा करता येतो. याबाबत दि. 22 सप्टेंबर 2021 ते दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी पावेतो बीड जिल्ह्यात  बीड शहरात व बीड जिल्यातील सर्व पोलीस ठाणे येथे दरम्यान विशेष मोहिम राबवुन ई चलनाच्या पेंडिग दंड भरण्याबाबत समुपदेश करण्यात येणार आहे. जे कसुदार वाहन चालक पेंडिग दंड भरणार नाहीत त्यांना मा न्यायालयीन कारवाईस समोरे जावे लागणार आहे. या करीता दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी मा.जिल्हा व सत्र न्यायालय व मा . प्रथम वर्ग न्यायदंडाकारी येथे लोक अदालत ठेवण्यात आली आहे. यामध्ये तडजोडी शुल्क वाहन चालक भरु शकतात, असे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!