Uncategorized

पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,खा.प्रितमताई मुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना,चारा उपलब्ध करून देण्याचीही मागणी

बीड । दि.२१ ।
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले आहे.पुरात वाहून गेलेल्या जनावराचा शव विच्छेदन अहवाल नसेल तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळण्यास अडचण येऊ शकते,यासंदर्भात प्रशासनाने गावच्या सरपंच,दूध संकलन केंद्राचे संचालक आणि पशुसंवर्धक पर्यवेक्षक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जनावराची नोंदनी ग्राह्य धरावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

यासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करताना कोल्हापूर, सातारा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना शासनाने ज्या निकषांच्या आधारे मदत केली, त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे.मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.यामध्ये वाहून गेलेल्या जनावरांचा शवविच्छेदन अहवाल मिळाल्या नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा नियम शेतकऱ्यांसाठी जाचक आणि मदतीपासून वंचित ठेवणारा होता,खा.प्रितमताई मुंडे यांनी याविषयी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लावलेल्या निकषा आधारे मदत करण्याची सूचना केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

तसेच अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा चारा वाहून गेला असल्याने त्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध देणे,नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून जिल्ह्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही खा.प्रितमताई मुंडे यांनी केल्या आहेत.पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून खा.प्रितमताई मुंडे यांनी वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळवून देण्याविषयी सूचना केल्यामुळे शेतकरी आश्वस्त झाले आहेत.

•••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!