Uncategorized

बीड शहरातील सर्व असंघटित कामगारांना बीड भाजप देणार मोफत ई श्रम कार्ड ! जास्तीत जास्त कामगारांनी लाभ घ्यावा – भाजप बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांचे आवाहन


बीड, 19 (प्रतिनिधी) :
केंद्र सरकारने घरगुतीकामे करणाऱ्या महिलांसाठी,सुतार,गवंडी,लोहार, सुरक्षाकर्मी,प्लंबर,भाजी विक्री अश्या अनेक कामगारांसाठी ‘श्रमिक कार्ड योजना काढली आहे. त्यामुळे सरकार दफ्तरी अश्या असंघटित कामगारांची नोंद होणार आहे त्यामुळे त्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकार वेबसाइटवर असंघटित कामगारांची नोंदणी करत आहे.प्रत्येक असंघटित कामगाराला ओळखपत्र दिले जाईल ज्यावर एक युनिक ओळख क्रमांक असेल. बीड जिल्ह्यातील असंगठीत कामगारांनी या योजनेत आपली नोंदणी करून केंद्र सरकारच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी केले आहे.
या डेटाबेस च्या आधारावर सामाजिक सुरक्षा योजना सरकारद्वारे अंमलात आणल्या जातील.पीएम सुरक्षा विमा योजना,एनडीयूडब्ल्यू अंतर्गत नोंदणीकृत कामगार पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थ्यांना प्रीमियम रु.१२एक वर्षासाठी माफ केले जातील. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.हा डेटाबेस असंघटित कामगारांसाठी धोरण आणि कार्यक्रमांमध्ये सरकारला मदत करेल. अनौपचारिक क्षेत्रापासून औपचारिक क्षेत्रापर्यंत कामगारांच्या हालचाली आणि त्यांचा व्यवसाय, कौशल्य विकास इ. स्थलांतरित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेणे, रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे सोयीस्कर होणार आहे. कामगाराचे वय १८-५९  वर्षे असावे आयकर भरणारा नसावा EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत. असंघटित कामगार श्रेणीमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे हे निकष पूर्ण करणारे प्रत्येक कामगार NDUW अंतर्गत नोंदणीसाठी पात्र आहेत.
केंद्र सरकारने लहान आणि सीमांत शेतकरी,सेरीकल्चर कामगार,शेतमजूर,मीठ कामगार,सुतार कामगार,वीटभट्ट्या आणि दगडखाणीतील कामगार,सामान्य सेवा केंद्रे,मच्छीमार कामगार,घरकाम करणाऱ्या महिला,जे पशुपालनात गुंतलेले आहेत, सॉ मिलमध्ये कामगार, रस्त्यावर विक्रेते,बीडी लाटणे, लेबलिंग आणि पॅकिंग,घरगुती कामगार,आशा कामगार, इमारत आणि बांधकाम कामगार,नाई,दूध उत्पादक शेतकरी,लेदर कामगार,भाजी आणि फळ विक्रेते,स्थलांतरित कामगार,विणकर,वृत्तपत्र विक्रेते,रिक्षा ओढणारे,ऑटोचालक,घरगुती कामे करणाऱ्या महिला,सुतार,गवंडी,लोहार,सुरक्षाकर्मी,प्लंबर,भाजी विक्री करणारे इत्यादी सर्वासाठी श्रमिक कार्ड योजना काढली आहे त्यामुळे सरकारी दफ्तरी अश्या असंघटित कामगाराची नोंद होणार आहे अशा कामगारांना सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. या कार्डची वैधता आयुष्यभरासाठी लागू असेल.भविष्यात केंद्र सरकारच्या विविध योजना प्राप्त करण्यासाठी या ओळखपत्राची आवश्यकता असणार आहे यासाठी बीड शहर भाजप ने पुढाकार घेत अनेक असंघटित कामगार यांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून मोफत शिबिराचे आयोजन केले आहे तरी आपल्या आधार कार्ड,बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांकासह असंघटित कामगरांनी दत्ता मानकर मो .9657613676 आणि
राजेश चरखा 9325059595
यांच्याशी संपर्क करावा, असे आव्हान भाजप बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!