Uncategorized

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार : खा.प्रितमताई मुंडे,शेती,फळबागा आणि पडझड झालेल्या घरांची पाहणी ; शेतकऱ्यांना दिला विश्वास

गेवराई । दि.१६ ।
जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीचा सामना करत असताना काही भागांमध्ये पूर,तर काही भागात तलाव फुटण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.यामुळे पिकांची हानी,घरांची पडझड आणि शेतजमिनी वाहून गेल्या आहेत.अतिवृष्टी,पूर आणि तलाव फुटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटाला तोंड देत आहेत.या नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे,त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक
मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला.

गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी आणि जातेगाव येथील तलाव फुटल्यामुळे या परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.या भागातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून खा.प्रितमताई मुंडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आ.लक्ष्मण अण्णा पवार यांच्यासह त्यांनी शेती,फळबागा,आणि पडझड झालेल्या घरांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.जर राज्यातील सरकारने मदत देताना हात आखडते घेतले तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मदत मिळवू असा विश्वास खा.प्रितमताई मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खा.मुंडे म्हणाल्या ‘पूर्वी शेतकऱ्यांना न मागता मदत मिळत असे,परंतु दोन वर्षाच्या काळात मदतीचा एक ही रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीची अपेक्षा राहिली नाही.या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी गेवराई तालुक्यातील मारफळा, टाकळगव्हाण,चोपड्याचीवाडी,राजापूर,तलवाडा या गावांना भेटी दिल्या.काही भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी ओसरल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे,प्रशासनाने याची दक्षता घेऊन तात्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

•••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!