नांदूरघाट, दि. 12 (लोकाशा न्यूज) : नांदूरघाटमध्ये मोठा दरोडा टळला आहे. तब्बल आकरा दरोडेखोर शस्त्रासह सीसीटीव्ही कॅमेर्यात निदर्शनास आले आहेत.
गणरायाचे आगमन याच मध्यरात्री नांदुर घाट मध्ये मोठे दरोडे पडणार परंतु गणरायाने हे येणारे विघ्न दूर केले, सुदैवाने घटना घडली नाही, परंतु चौकामधील दुकानदाराच्या कॅमेरामध्ये अकरा दरोडेखोर सर्वांनी काळे ड्रेस परिधान केलेले हातामध्ये कुराड कोयते व शस्त्र गावामध्ये शिरले, परंतु गणरायाचे आगमन काही गणपती मंडळाचे कार्यकर्ते जागे असल्याने गावात शिरकाव झाला नाही, दरोड्याचा मोठा प्रयत्न दरोडेखोरांचा असफल झाला, त्यांच्या पूर्ण हालचाली व त्यांची पळापळ दुकानाच्या कॅमेर्यामध्ये कैद झाली याचे फुटेज पाहिले असता थरकाप उडेल अशी परिस्थिती होती, हे सर्व फुटेज पाहून नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिवसभर नांदुर घाट व परिसरात पेट्रोलिंग केली व संशयित पारधी पिढीवर जाऊन खडे बोल सुनावून यंत्रणा सतर्क केली परिसरात काही घटना घडली तर याद राखा असा निर्वाणीचा इशारा दिला, तसेच रात्रीपासून नांदुर घाटमध्ये नांदुर घाट चौकीचे जमादार शेप, बडे, शेख यांनी रात्रीची गस्त वाढवली तसेच ग्रामसुरक्षा दल स्थापन करून गावात ग्रामसुरक्षा दलाबरोबर पोलीस कर्मचारी रोज सोबत राहते सध्या पोलिसांची रात्री पासून गस्त सुरू केली. मागील आठ ते दहा दिवसात पोलिसांचे खांदेपालट झाली नांदुर घाट चौकीचे पूर्ण कर्मचारी तसेच केज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची बदली झाली नवीन कर्मचारी आले हे येताच दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला, या दरोड्यामध्ये मोठी टोळी समोर दिसल्याने कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सर्व यंत्रणा सक्रिय करून पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन यंत्रणा उभा केली. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, कारण सर्व दरोडेखोर शस्त्रासह होते, यावेळी स्वतः शंकर वाघमोडे यांनी गावकर्यांना धीर देऊन आम्ही सोबत आहोत तुम्ही-आम्ही गावची सुरक्षा नक्की करू असा शब्द दिला व पोलीस कर्मचार्यांना सक्त आदेश गस्तीचे दिले.