बीड, यंदा खरीप पेरणीपूर्वी आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पिकांसाठी पोषक पाऊस पडला असताना मागच्या काही दिवसांमध्ये अवेळी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले,या पार्श्वभूमीवर काल खा. प्रीतमताईंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांना दिल्या.तसेच गतवर्षीच्या खरीप विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही,यासंदर्भात शासनस्तरावर योग्य कार्यवाही आणि पाठपुरावा करण्याचा सूचना देखील यावेळी खा. प्रीतमताईंनी केल्या.