बीड, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,या अनुषंगाने आज जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना खा प्रीतमताईंनी सूचना केल्या.
प्रत्येक गावात पोलिसांचा सहकारी म्हणून पोलीस मित्राची नियुक्ती करून ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना राबविली तर नागरीकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.गुन्हेगारी प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारी घटनांना आळा बसेल,अशा सूचना पोलीस अधीक्षकांना केल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी ‘पिंक मोबाईक पथक’ या उपक्रमाविषयी माहिती दिली.महिलांच्या तक्रारी आणि सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पिंक मोबाईक पथकची व्याप्ती वाढविण्यासह त्याची उपयोगिता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा पोलीस दलामार्फत प्रसार आणि प्रचार करण्याच्या सूचना ही दिल्या.
पोलीस अधीक्षकांनी माझ्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन पुढील काळात पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्याचा मनोदय खा. प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.