Uncategorized

अभिमानास्पद ! कल्याण-डोंबीवली शहरातील रस्त्याला दिले स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे नाव

अंबाजोगाई : राजकारणात काम करणारा कार्यकर्ता आपल्या नेत्यावर असलेली निष्ठा कधीच लपवु ठेवत नाही. पण तो कार्यकर्ता प्रामाणिक, निष्ठावान असावा लागतो हे तितकंच खरं. रासपा नेते महादेव जानकर ज्याप्रमाणे मुंडे भगिनीला प्रतिवर्षी रक्षाबंधनाला विसरत नाहीत ही कडवी निष्ठा तसंच कल्याण-डोंबीवली शहरात नगरसेवक श्रीकर विष्णु चौधरी यांनी आपल्या निधीतुन तयार केलेल्या चोळे कचोरे रेल्वे समांतर रस्त्याला स्व.गोपीनाथराव मुंडे मार्ग हे नाव दिलं आहे.  गोपीनाथ मुंडे हे नेतृत्व सर्वव्यापी, सर्वदुर, सर्वस्पर्शी होतं. महाराष्ट्र राज्यात शिवाय इतर राज्यातही त्यांना मानणारा फार मोठा वर्ग होता आणि आहे. राजकारणात नेतृत्वावर निष्ठा दाखवायची झाली तर कार्यकर्ते आपली निष्ठा कधीच लपवुन ठेवत नाहीत. बिनधास्तपणे नेतृत्वाच्या प्रेमापोटी श्रद्धा प्रकट करतात. वास्तविक अलीकडच्या काळात स्वार्थासाठी दाखवल्या जाणार्या निष्ठा आणि मतलबी यात जास्त वाढ झाली तो भाग वेगळा. पण बीड जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या स्व.गोपीनाथराव मुंडेंचं नाव तीर्थक्षेत्र तिरूपती बालाजीच्या प्रमुख चौकात लावुन हॉटेल चालवणारा कार्यकर्ता आपण पाहिला. अलीकडच्या काळात साहेबांचा फोटो टाकल्याशिवाय लग्न पत्रिकासुद्धा निघत नाहीत. पराकोटीची श्रद्धा आणि लाखो चाहते त्यांचे आहेत. त्यामुळे आपआपल्या परीने जसं की नाशिक शहरात एका कार्यकर्त्याच्या घरी साहेब गेल्यापासुन आजही दिपज्वलन चोवीस तास होतं. ज्या कार्यकर्त्याच्या घरी पंकजाताईनं भेट दिलेली आहे. अशा अनेक माध्यमातुन कुठं ना कुठं काही तरी या नेतृत्वाच्या स्मृती, आठवणी उजळल्या जातात. कारण साहेब हे नेतृत्वच असं होतं ज्याची आठवण आणि चेहरा आजही डोळ्यासमोर आला तर डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय रहात नाहीत. आता बघा कल्याण-डोंबीवली महानगरपालिकेत श्रीकर चौधरी चोळेगाव नगरसेवक यांची श्रद्धा. त्यांनी आपल्या विकास निधीतुन जो रस्ता तयार केला त्या रस्त्याला महानगरपालिका अंतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे मार्ग हे नाव देवुन छान रेखीव नामफलक लावला आहे. खरंच करायचं तर मनातुन नाही तर नाटकं, राजकिय जगणं क्षणिक बरं वाटत असलं तरी धोक्याचं असतं. सोशल मिडियावर ज्यावेळी नामकरण, फलक व्हायरल झाला तो विषय सर्वत्र चर्चेचा झाला. कारण आजही मुंडे साहेबांवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. बीड जिल्ह्यात साहेबांची कुठलीही अशी बातमी आली की चौफेर चर्चा होते. सांगायचं तात्पर्य ज्यांची श्रद्धा असते ती माणसं आपल्या र्हदयात मातृ-पितृ जागा ठेवुन श्रद्धा र्हदयी भाव ठेवतात. कदाचित सन्मानाने नगरसेवक चौधरी यांचा हाच भाव असावा ज्यातुन त्यांनी रस्ता मार्गाला हे नाव दिलं. अशा निष्ठेचं कौतुक करावं तेवढं कमीच.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!