Uncategorized

घोटाळेबाजाणांना पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांचा दणका, हरभरा आणि तूर खरेदीच्या घोटाळ्यातील सहा जणांना पकडले


बीड : दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात खळबळ माजवून दिलेल्या कोट्यवधींच्या हरभरा आणि तूर घोटाळ्यातील ६ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे . या सहा आरोपींना बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . यातील १५ पेक्षा अधिक आरोपी अजूनही फरार आहेत . तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात तूर आणि हरभरा खरेदीतील घोटाळा समोर आला होता . बीड जिल्हा कृषी औद्योगोक सर्व सेवा सहकारी संस्थेने मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची केली होती .
शेतकऱ्यांकडून या मालाची खरेदी करण्यात आल्यानंतर मार्केटिंग फेडरेशनकडून त्याची रक्कम उचलण्यात आली मात्र फेडरेशनला सदर माल दिलाच गेला नाही . याप्रकरणात काही व्यक्तींनी तक्रारी केल्या , उपोषणे झाली , त्यानंतर एप्रिल २०१९ मध्ये या प्रकरणात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . यात बीड जिल्हा कृषी औद्योगोक सर्व सेवा सहकारी संस्थेचे संचालक , केंद्र प्रमुख , ऑपरेटर यांना आरोपी करण्यात आले होते . याप्रकरणात आतापर्यंत केवळ चाँदसाहेब हसनभाई बागवान या एकाच आरोपीला अटक करण्यात आली होती , तर इतर आरोपी फरार होते . सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ , तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी . आर . भिंगारे यांच्यासह सुरेश सांगळे , राजू पठाण , श्री . बहिर्वळ , श्री भिसे यांनी वेगवेळ्या ठिकाणाहून यातील ६ आरोपींना केली आहे . या आरोपींना २ दिवसाची पोलीस सुनावण्यात आली आहे .

सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ , तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी . आर . भिंगारे यांच्यासह सुरेश सांगळे , राजू पठाण , श्री . बहिर्वळ , श्री भिसे यांनी वेगवेळ्या ठिकाणाहून यातील ६ आरोपींना अटक केली आहे . या आरोपींना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . यांना केली अटक अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश चोरमले ( वय ३८ , केंद्र प्रमुख वडवणी ) , मुंजाबा मैंद ( वय ३ ९ , ऑपरेटर चिंचाळा ) , जावेदमिया बागवान ( वय ४० , केंद्रप्रमुख बीड व गेवराई ) , गोविंद दौंड ( वय ४२ , ऑपरेटर परळी ) , राजाराम काजगुंडे ( वय ३ ९ , ऑपरेटर परळी ) , श्रीराम शिंदे ( वय ३७ , ऑपरेटर गेवराई ) यांचा समावेश आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!