Uncategorized

पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत उद्या सामुदायिक राष्ट्रगान,वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर पहिल्यांदाच होणार आगळा-वेगळा अन् लक्षवेधी कार्यक्रम ; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

परळी ।दिनांक १४।
सर्व सामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी आणि प्रत्येकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून उद्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सामुदायिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वा. वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर हा सामुदायिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायजर आणि सामाजिक अंतर राखून ‘जन-गण-मन’ गायले जाणार आहे. यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची आपल्याला बालपणापासून उत्कंठा व आकर्षण असते यात सर्वच नागरिकांना सहभागी होता येते असे नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्राभिमान जागृत व्हावा या उद्देशाने अशा प्रकारचे सामुदायिक राष्ट्रगान परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. पंकजाताई मुंडे हया स्वतः यात सहभागी होणार असून वाद्यवृंद, पारंपरिक वेशभूषा, प्रत्येकाच्या हातात राष्ट्रध्वज, भव्य रांगोळी अशा प्रसन्न वातावरणात हा आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या परिवारासह तसेच सर्व सामान्य नागरिकांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!