टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीमध्ये उपांत्य पूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाची उपांत्य फेरीत आता बेल्जियम विरुद्ध होणार आहे. भारतीय हॉकी संघने ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात भारताने संपूर्ण वचर्स्व ठेवले. भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ केला. पहिल्या हाफमध्ये भारताकडे २-० अशी आघाडी होती. भारताकडून दिलप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर गुरजत सिंगने १६व्या मिनिटाला गोल करून संघाला २-० अशी आघाडी मिळून दिली.दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने पहिला गोल करून भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. पण ५७व्या मिनिटाला हार्दिकने फिल्ड गोल करून संघाला विजयी अशी ३-१ आघाडी मिळवून दिली. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर भारतीय हॉकीचा उतरणीचा कालावधी सुरू झाला होता. १९८४च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताला पाचवा क्रमांक मिळाला होता एवढेच. त्यानंतर भारत कधीच उपांत्य फेरीत पोहोचला नव्हता. भारत १९७२च्या ऑलिम्पिकमध्ये अखेर उपांत्य फेरीत पोहचला होता.