अंमळनेर – अंमळनेर जवळ असणाऱ्या दौलतवाडी येथे स्कार्पीओ व दुचाकीच्या धडकेच एक युवक जागीच ठार झाला असुन घटनास्थळी तात्काळ अंमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणे प्रमुख पीआय मनिष पाटील पोलीस कर्मचारी रवि आघाव यांनी धाव घेतली होती मयत झालेल्या युवकाचे नाव हे परशुराम आश्रुबा बेदरे वय 26 रा.भडकेल ता.शिरुर असे आहे .बीडकडून अहमदनगरच्या दिशेने जाणारी स्कार्पीओ गाडी क्रमांक एम एच 23 A J 1317 हिने दुचाकी वर असणाऱ्या परशुराम बेदरे यांना जोराची धडक दिली हि धडक एवढी भयानक होती या धडकेत दुचाकी स्वार परशुराम बेदरे यांच्या हे जागीच ठार झाले अपघातातील स्कार्पीओ गाडी अंमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणे प्रमुख मनिष पाटील पोलीस कर्मचारी रवी आघाव ,पंकज आघाव ,शिवाजी गोडे ,वाहन चालक विठ्ठल वारे यांनी ताब्यात घेतली आहे अंमळनेर जवळ दौलवाडी येथे स्कार्पीओ गाडीच्या धडकेत युवक जागीच ठार हि घटना बुधवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान घडली असुन स्कार्पीओ चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.