बीड

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसही धावली, रूपालीताईंचा आदेश आणि आ. संदिप भैय्यांच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्त भागात मदत पाठविली


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्रातला बराचसा भाग पुराने उध्वस्त झाला आहे. या उध्वस्त झालेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसही धावली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने आणि आ. संदिप भैय्यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पुरग्रस्त भागात मदत पाठविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आणि बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि नगर परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत भैय्या क्षीरसागर, माजी आमदार अ‍ॅड उषाताई दराडे, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पुरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर, कराड, महाड, चिपळूण भागात आलेल्या महापूराने संपूर्ण जन जीवन उध्वस्त झाले आहे. दरडी कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जनावरेही वाहून गेले आहेत. कोरोना उपचार केंद्रात पाणी घुसल्याने आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवर असणारे बरेच रुग्ण मृत झाले आहेत. या अतीव दुःखद संकटात आपल्याला जमेल ती मदत करूया या उद्देशाने मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर ,नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या भागातून महिला काँग्रेस तर्फे मदत पाठवली आहे. यावेळी डी. बी. बागल,वारे ताई, के. के. वडमारे (युवक प्रदेश सचिव), अ‍ॅड. सौ प्रज्ञा खोसरे (मराठवाडा समन्वयक), सौ संगीताताई तूपसागर (जिल्हाध्यक्ष बीड), सौ संध्याताई भांडेकर (माजलगाव तालुकाध्यक्ष), सौ अनीताताई वाघमारे (तालुका कार्याध्यक्ष) आदि उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!