बीड

डीएचओ राधाकिसन पवार यांची सातार्‍याला बदली, तीन वर्ष नऊ महिण्याच्या सेवेत डॉ. पवारांनी आरोग्याचे अनेक प्रश्‍न लावले तडीस, जिल्हा त्यांच्या सेवेला कधीच विसरणार नाही


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सक्षमपणे काम करणारे डॉ. राधाकिसन पवार यांची सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेले डॉ. राधाकिसन पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरून अत्यंत चांगल्या पध्दतीने कर्तव्य बजावले, त्यामुळेच त्यांना जिल्ह्यात 3 वर्षे 9 महिणे काम करण्यास संधी मिळाली, इतर जिल्ह्याप्रमाणेच मागच्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यालाही कोरोनाने घेरलेले आहे. या दोन वर्षातील डॉ. पवार यांच्या कामांने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले, कारण या महामारीत त्यांनी प्रत्येक ठिकाणी तात्काळ सेवा देण्याचे काम केले, जिल्ह्यात त्यांच्या सेवेचा कार्यकाळ पुर्ण झाला असून त्यांच्या विनंतीनुसारच त्यांची सातारा जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने 19 जुलै रोजी आदेश काढले आहेत. दरम्यान डॉ. पवार यांची आज जरी बदली झाली असली तरी त्यांनी दिलेली सेवा बीड जिल्हा कधीच विसरणार नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!