बीड

टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धेत बीडचा अविनाश साबळे भारताचे प्रतिनिधीत्व करणार, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी पंकजाताईंनी साबळेंना दिला आशिर्वाद


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : क्षेत्र कोणतेही असो, त्या त्या क्षेत्रातून बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणार्‍यांच्या पाठीशी लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या नेहमीच खंबीरपणे उभा राहिलेल्या आहेत. मग क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नाव पुढे घेवून जाणारा राहूल आवारे असो की अविनाश साबळे… आता टोकीयोमध्ये होणार्‍या स्पर्धेत बीडचा अविनाश साबळे हा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे, या स्पर्धेत साबळेंनी बीड जिल्ह्याचे नाव पुन्हा एखदा उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा आणि आशिर्वाद पंकजाताईंनी दिले आहेत.
टोकियोमध्ये येत्या 23 जुलैपासून होत ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत, या स्पर्धेत  मांडवा, (ता.आष्टी जि.बीड) येथील अविनाश साबळे हा सैन्य दलातील तरुण 3000 मीटर्स स्टिपलचेस प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेसाठी पंकजाताईंनी अविनाशला शुभेच्छा आणि बीड जिल्ह्याचे नाव पुन्हा एखदा मोठे करण्यासाठी आशिर्वाद दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!