बीड

कोरोना नक्कीच थांबेल, तुम्ही फक्त प्रशासनाला सहकार्य करा, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे यांचे आवाहन


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : कोरोना नक्कीच थांबेल, तुम्ही फक्त शासन, प्रशासनाला सहकार्य करा, त्यांनी लागू केलेले सर्व नियम पाळा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे यांनी जिल्हावासियांना केले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना गतीने आपले पाय पसरत आहे, यामुळे जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. अशा परिस्थितीमुळेच राज्य शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कडक निर्बंध करावे लागत आहेत. त्यामुळे भविष्यात हा कोरोना नक्कीच थांबणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पाळन करा, प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोनावर मात करण्यास सर्वांचाच यश येणार असल्याचा विश्‍वास अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ज्या ज्यावेळी बीड जिल्ह्यावर संकट आले त्या त्यावेळी अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे ह्या बीड जिल्हावासियांच्या मदतीला धावून आलेल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!