बीड

जिल्ह्यात किराणा, भाजी-फळ विक्री दुकानाच्या वेळा बदलल्या; जाणून घ्या वेळा


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : कोविड -19 विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी ( Break the Chain ) प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत . याबाबत पुरवणी आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवा श्रेणीमध्ये असलेली किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रो, चिकन , मटन विक्रीचे दुकाने, बेकरी आदी शॉप सकाळी 07.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच केवळ हातगाड्यावर फिरून फळांची विक्री सायंकाळी 05.00 ते सायं . 07.00 वाजेपर्यंत करता येईल . सदरहू आदेशाची अंमलबजावणी सोमवार दिनांक 19.04.2021 पासून करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी रविवारी काढले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!