Uncategorized

रूग्णांची गैरसोय होता कामा नये,रूग्णांवर तात्काळ उपचार करा, ‘रेमडेसीवर’चा काळाबाजार थांबवा- खा. प्रीतमताईंनी थेट कोविड वार्डातील रूग्णांशी संवाद साधून जिल्हा आरोग्य यंत्रणेला सोडले आदेश


बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : ज्या ज्यावेळी बीड जिल्ह्यावर संकट आले त्या त्या संकटात खा. प्रीतमताई नेहमीच बीड जिल्हावासियांच्या मदतीला धावून आल्या आहेत, सध्या जिल्हावासियांना कोरोनाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अगदी मागच्या वर्षीप्रमाणेच याहीवेळी खा. प्रीतमताई जिल्हावासियांच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यांनी बुधवारी रात्री दोन तास येथील जिल्हा रूग्णालयात थांबून रूग्णांच्या आणि आरोग्य यंत्रणेच्या समस्या जाणून घेतल्या, विशेष म्हणजे यावेळी त्यांनी थेट कोविड वार्डात जावून रूग्णांशी आपुलकीने संवाद साधला. रूग्ण कोविडग्रस्त असो की नॉन कोविड, यापैकी एकाही रूग्णाची गैरसोय होता कामा नये, त्यांच्यावर तात्काळ आणि योग्य वेळेत उपचार करा, रेमडेसीवरमध्ये होत असलेला काळाबाजार थांबवा, असे आदेश यावेळी खा. प्रीतमताईंनी आरोग्य यंत्रणेतील संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यांच्या या एका आदेशाने आरोग्य यंत्रणा आता गतीने कामाला लागली आहे.
खा. प्रीतमताई स्वत: एक डॉक्टर आहेत, त्यामुळे सध्या आरोग्य यंत्रणा नेमकी कशी काम करते आणि त्यांनी आपले काम थांबवले तर त्याचे काय परिणाम होवू शकतात हे खा. प्रीतमताईंना चांगलेच माहित आहे, याअनुषंगानेच येथील जिल्हा रूग्णालयात त्यांनी बुधवारी  जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या समस्या जावून घेतल्या. जिल्ह्यात ऑक्सीजनची काय परिस्थिती आहे, कोविड, नॉन कोविड रूग्णांची संख्या, रेमडेसीवर इंजेक्शनचा साठा, उपलब्ध बेड, कोरोनाचे उपचार घेत असलेली रूग्ण संख्या, बरे होवून घरी परतलेल्या रूग्णांची संख्या याविषयी सविस्तर माहिती यावेळी त्यांनी  जाणून घेतली, सुरूवातीला त्या स्वत: कोविड वार्डात गेल्या आणि त्या ठिकाणच्या रूग्णांशी आपुलकीने संवाद साधला. त्यानंतर जिल्हा रूग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकीत्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्यासह इतर अधिकार्‍यांशी संवाद साधला. ‘कॅजोरिटीमध्ये व्हीलचीयर आणि स्टेचरची संख्या वाढवा, वार्डवाईज वायरलेस वॉकीटॉकी सिस्टीम बसवा, जेणे करून सिरीयस पेशंट व वॉर्डची पुर्ण माहिती कोणत्या ठिकाणी किती बेड आणि व्हेंटीलेटर आणि बायपॅप, बॅगमास मशीन शिल्लक आहे हे मोजक्या वेळेत कळेल. कॅजोरिटीमध्ये वॉर्डबॉय, एमओ व इतर स्टाफची संख्या वाढवा, कॅजोरिटीमध्ये सिरीयस रूग्णांची  सॅच्यूरिशन 90 च्या खाली आहे व जे नैर्सगिक श्‍वास घेवू शकत नाही अशा पेशंटसाठी अ‍ॅब्यूपंप, मास्कबॅग व छोटे 2 सिलेंडर मशीन तात्काळ उपलब्ध करून त्यांना आयसीयूपर्यंत अ‍ॅडमीट करण्यापर्यंत उपलब्ध रहा,  प्रत्येक वार्डामध्ये नवीन पेशंट व दुरूस्त झालेले रूग्णांची विभागणी करा, जुनी आयसीयु वार्ड, आयुष विभाग, वार्ड क्र. 23, ओपीडीचे वार्ड एमजन्सीसाठी वापरा, सरकारी रूग्णालय जवळील (कोरोना रूग्णालय) लॉजींग, हॉटेलस्, शासकिय ईमारती पाहणी करून वाढत्या रूग्णांची संस्था गृहीत धरून आरक्षीत करा, आदित्य कॉलेजमधील शासकिय रूग्णालयाचे आयसीयूमध्ये बेड वाढवा, व्हेंटीलेटर व बायपॅप मशीन वाढवा, आदित्य कॉलेजमधील वार्डातील स्वच्छालय दुरूस्त करा, गर्भवती महिला, अस्थिव्यंग रूग्ण, अंध, मुकबधीर व कोमातील रूग्णांची सोय कोरोना वार्डातील सोयच्या ठिकाणी करा, सध्याची बीड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती स्थिती पाहता कोरोनावर लागू पडणारे सर्व औषधी तुटवडा होणार नाही याचा अंदाज घेवून संग्रहीत करून ठेवा, कोणत्याही परिस्थितीत रेमडेसीवरमधील काळाबाजार  रोखा, हे सर्व करीत असताना रूग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, त्यांना तात्काळ आणि योग्य वेळेत उपचार द्या, असे आदेश यावेळी खा. प्रीतमताई मुंडे यांनी जिल्हा रूग्णालयातील आढाव्यातून संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपचे नेते सलिम जहाँगिर, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, सुनील , स्वप्नील भैय्या गलधर, संदिप उबाळे, देविदास नागरगोजे, दिपक थोरात, स्विय सहाय्यक राजेंद्र लोढा, राजेश मुंडे, दुर्गादास लांब यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

मनुष्य बळ वाढवा, त्यासाठी आम्ही लागेल
ती मदत करू  
कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार सक्षमपणे काम करीत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळ असो की अन्य कोणत्या गोष्टी, ज्या गोष्टींची कमतरता भासेल, त्या गोष्टी आम्ही आमच्या सरकारकडून मिळवून देवू, गरज पडली तर राज्य सरकारशीही भांडू, मात्र रूग्णांचे हाल होवू देवू नका, त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करा, असे आदेश त्यांनी यावेळी सोडले आहेत.    

ट्रेनिंग सेंटरमधूनच ब्लॅकने रेमडेसीवर
होतेय विक्री
जिल्हा रूग्णालयाच्या ट्रेनिंग सेंटरमधून रेमडेसीवर इंजेक्शनची ब्लॅकमध्ये विक्री होत असल्याचे या आढाव्या बैठकीदरम्यान संदिप उबाळे यांनी खा. प्रीतमताईंच्या निदर्शनास आणून दिला. यावर कडक भुमिका घेत रेमडेसीवरमधील काळाबाजार थांबवा, अशा सुचना यावेळी खा. प्रीतमताईंनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. दरम्यान ट्रेनिंग सेंटरमध्ये बसून रेमडेसीवर इंजेक्शन ब्लॅकमध्ये नेमके कोण विक्री करतो, याची चर्चा आता  जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!