महाराष्ट्र

महाआघाडीचा अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी ७५०० कोटींची घोषणा

कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.

– ठाणे खाडीला समांतर कोस्टल रोडसाठी १२५० कोटींचा खर्च अपेक्षित

– पाणी पुरवठा आणि स्वछता विभागाला २५३३ कोटी

-उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी १३९१ कोटी

– नेहरू सेंटरसाठी १० कोटींचा निधी

– घरकुल योजना राबवण्यासाठी गेल्या वर्षात २९२४ कोटी खर्च तर पुढील आर्थिक वर्षासाठी ६८२९ कोटीची तरतूद

– चिपी विमानतळ सुरु करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात

– एसटी बस आगारांचा विकास , १४०० कोटींची तरतूद

– ठाणे आणि पुण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प

– पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम झपाट्याने होणार , २३५ किमी लांबीचा मार्ग , १६०३९ कोटींचा खर्च , कॅबिनेटची मंजुरी

– ईस्टर्न फ्रिवेचे नामांतर ; आता विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्ग म्हणून ओळखला जाणार

– सागरी महामार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च

– मदत आणि पूर्नवसन विभागासाठी १३९ कोटी

– जलसंपदासाठी १२९८१ कोटींची तरतूद

– गोसीखूर्द प्रकल्पासाठी १००० कोटी

-पणन आणि वस्त्रोद्योगासाठी १२८४ कोटींचा निधी

– औंध येथे रुग्णालय, राज्यात आठ मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक लॅब , १५० रुग्णालयात कर्करोग निदानासाठी सुविधा देणार

– आरोग्य सुविधांसाठी ७५०० कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा

-शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्ज माफी योजना , ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना लाभ

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!