महाराष्ट्र राजकारण

अखेर संजय राठोड राजीनामा घेऊन पोहोचले मुख्यमंत्र्यांकडे!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा पत्र घेऊनच संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहे.

वनमंत्री संजय राठोड आपला पदाचा राजीनामा देण्यासाठी पत्र घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्य वर्षा निवास्थानी दाखल झाले आहे. आता प्रत्यक्षात काय निर्णय होतोय हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे. पुढील काही तासांतच संजय राठोड त्यांचा वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

पोहरादेवी महंताचा विरोध

वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण, पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे.

महंत जितेंद्र महाराज यांनी ई-मेलद्वारे विनंती केली आहे. संजय राठोड यांच्याबद्दल ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहे, त्याबद्दल सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती जितेंद्र महाराज यांनी केली आहे.

तसंच, जर वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर पोहरादेवी गडावरून राठोड यांना शिवसेनेच्या आमदारकीचा ही राजीनामा द्यायला लावू, असंही जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!