बीड

कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज व्हा, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे निर्देश, विभागीय उपायुक्तांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही साथ आटोक्यात येण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे यासाठी मास्क वापरत नसणारे नागरिक, सामाजिक अंतराचे पालन न करणार्‍या व नियमांचा भंग करणार्‍यांवर कारवाई करावी. कोरोना रुग्णांवर उपचार व तपासण्यांसाठी टेस्टिंग सेंटर्स, कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर सज्ज करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोरोना उपाययोजनांबाबत बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (विकास आस्थापना) सुरेश बेदमुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , निवासी उपजिल्हाधिकारी संताष राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार , स्वारातीमग्रा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, डब्ल्यू.एच.ओ. समन्वयक डॉ.अमोल गायकवाड तसेच जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना बाबत जिल्ह्यातील नागरिकात सतर्कता वाढणे साठी प्रशासनाने आखलेल्या उपायोजना तात्काळ राबविण्यात याव्यात. दुकानदार, व्यावसायिक, जनतेच्या जास्त संपर्कात असलेले सुपर स्प्रेडर यांना कोरोना तपासणी करून नंतर व्यवसाय-दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जावी. यासाठी कोरोना तपासणीची मोहीम राबवावी. मंगल कार्यालये, सभागृहे, क्लासेस, गर्दी होणारी बस, वाहने आदी ठिकाणी नियम भंग होत असेल तर कारवाई केली जावी. तसेच रुग्णांवर उपचारांसाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर आणि र्लेींळव-19 रुग्णालये यांची सज्जता करणे गरजेचे आहे. याबरोबर तालुकास्तरावरील यंत्रणेने देखील सक्षमपणे कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी श्री जगताप म्हणाले. उपायुक्त श्री.बेदमुथा यांनी सांगितले, कोरोना साथ वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यादृष्टीने लसीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन ती यशस्वी केली जावी. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये असणारी बेड्सची संख्या तसेच वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांची उपलब्धता ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा सज्ज ठेवून येणार्‍या प्रसंगासाठी तयारी पूर्ण केली जावी. यासाठी जिल्हा रुग्णालय, स्वारातीमग्रा वैद्यकीय महाविद्यालय, लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालय येथे असणार्‍या सुविधा वैद्यकीय सुविधा कार्यान्वित करण्याची काळजी घ्यावी असे उपायुक्त म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार यांनी सांगितले की कोरोनाच्या साथीशी लढताना मागच्यावेळी जिल्ह्यात यशस्वी कार्यवाही झाली होती रुग्ण संख्या वाढल्यानंतर त्याचा सक्षम पणे मुकाबला करण्यात आला होता. त्या दृष्टीने सुपर स्प्लेंडर्सच्या अ‍ॅटिजन तपासण्यांसाठी मोहीम राबवून ते यशस्वी करण्यात आली होती. त्याबाबतची माहिती तालुका स्तरावरील यंत्रणेकडे उपलब्ध असून त्याचा वापर करून पुन्हा सुपर सप्रेडर्सच्या तपासण्या केल्या जाव्यात .तसेच तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व गाव स्तरांवरील यंत्रणा यांनी मागील वेळचा अनुभव ध्यानात घेता त्या आदेशांप्रमाणे तात्काळ कार्यवाही सुरुवात करावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार म्हणाले. याप्रसंगी जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोना तपासण्यांची माहिती सादर करण्यात आली. भरारी पथक स्थापन करून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यास कारवाई करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविंड रुग्णालया व्यतिरिक्त रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास बेड सुसज्ज ठेवण्यात यावेत, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणार्‍यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. कोरोना वाढत असून त्या दृष्टीने काळजी घेतली जावी असे यावेळी सांगण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!