बीड

राष्ट्रवादीत इन्कमिंग; पालवन चौकातील युवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश शिवाजी चव्हाणासह युवकांचे आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, सुनिल धांडे यांनी केले स्वागत


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृृत्वाखाली बीड मतदार संघातील युवकांची मोठी फळी दाखल होत आहे. बीड शहरातील विविध भागातील युवक राष्ट्रवादीत येत असतांना आ.संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवाजी चव्हाणसह पालवन चौकातील युवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शिवाजी चव्हाण यांच्यासह युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आ.संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांनी त्यांचे स्वागत केले.
बीड शहरातील धानोरा रोड पालवन चौकातील शिवाजी चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी सामाजीक कार्यात सक्रीय होते. या सामाजिक कार्याला पाठबळ मिळावे, जनसामान्यांची सेवा करत असतांना राजकीय पाठबळ मिळावे यासाठी शिवाजी चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखिल पालवन चौक परिसरात सक्रीय कार्यकर्ता मिळाला आहे. शिवाजी चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचेे शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, राष्ट्रवादीचे युवा नेते विजय लव्हाळे, युवराज बहिरवाळ, सरपंच परशुराम खोड, युवक विद्यार्थी नेते कुंदन काळे, राजापुरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

चौकट
धानोरा रोड, पालवन चौक परिसराच्या
विकासासाठी प्राधान्य देवू-आ.संदिप क्षीरसागर

या भागातील जनतेनं आमच्यावर प्रेम केलं आहे. खडतर काळात साथ दिली आहे. या भागातील प्रमुख रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत, ती लवकरच सुरू होतील, काही कामे सुरू आहेत, त्याची गुणवत्ता आणि दर्जा टिकला पाहिजे यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष रहावंं. या परिसराच्या विकासासाठी प्राधान्यानं निधी देऊ अशी ग्वाही या भागातील नागरीकांशी बोलतांना आ.क्षीरसागर यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!