बीड

जिल्हा रुग्णालयात तोबा गर्दी; लसीकरण केंद्रातच नियमांचा फज्जा

बीड, दि.22:- जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून लस घेण्यासाठी आलेल्यानी तुफान गर्दी केली होती. जिल्हाधिकारी जगताप यांच्या आदेशाने लागू केलेल्या नियमाचे त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून पायमल्ली तुडवत सोशल डिस्ट्न्स, मास्क, सॅनिटायझर आदी सर्व नियमाचे लसीकरण केंद्रातच फज्जा उडाल्याचे दिसले.

सर्वसामान्य लोकांना नियम शिकविणाऱ्या आणि नियमाचे पालन करा असे आदेश देणाऱ्या पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यात आज सोमवार दि. 22 फेब्रुवारी रोजी लस घेण्यासाठी येणाऱ्या पोलीस, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तोबा गर्दी करण्यात आली होती. आलेल्या कर्मचाऱ्यांना नियमाचे पालन करून लस देने हे आरोग्य विभागाचे काम होते परंतु आरोग्य प्रशासनाचे येथे कसलेही नियोजन नव्हते. इतरांना कोरोना नियम सांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रातच नियमांचा फज्जा उडाल्याचे सोमवारी दिसून आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर किंवा जिल्हा आरोग्य विभागावर काय एक्शन घेतील का कर्मचारी आहेत म्हणून पाठराखण करतील हे पाहणे गरजेचे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!