महाराष्ट्र

खा. रक्षा खडसेंना कोरोनाची लागण


जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बुधवारी रात्री रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. रक्षा खडसे यांची प्रकृती बिघटल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे. खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बर्‍या झाल्या होत्या. रक्षा खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव वीज बील, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी रक्षा खडसे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!