राजकारण महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला (Arun Rathod) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.
चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला. पोलीस अहवालात विजय चव्हाणहीसोबत असल्याचा उल्लेख आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. याप्रकरणात एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. याअगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी आहे.

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?
पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही.

यवतमाळच्या रिपोर्टमध्ये काय?
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टवर इंग्रजीत ड्राफ्ट कॉपी असं लिहिलं असून त्या खाली शॉर्ट केस रेकॉर्ड असं लिहिलं आहे. रिपोर्टवर प्रिंट दिनांक 17 फेब्रुवारी 2021 लिहिलं आहे. वेळ दुपारी 1.47 वाजताची लिहिली आहे. तर सेव्हड तारीख 12 फेब्रुवारी 2021 लिहिली असून वेळ संध्याकाळ 7.29 वाजताची लिहिली आहे. तसेच 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी रुग्णालयात भरती केल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे पूजा अरुण राठोड या तरुणीवर 6 फेब्रुवारी रोजी उपचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. वॉर्ड नंबर 3 मध्ये या महिलेला अॅडमिट करण्यात आलं असून युनिट नंबर 2 मध्ये ही तरुणी उपचार घेत असल्याचंही त्यावर नमूद करण्यात आलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही गुंतागुंतीशिवाय या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचंही त्यात स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!