राजकारण महाराष्ट्र

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल, पूजा चव्हाण प्रकरणाची माहिती घेणार

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. यात वादाच्या भोवर्‍यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असतांनाच पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय यामुळे मंत्री संजय राठोड यांचा ताप वाढणार की संजय राठोड यांना मदत होणार याकडे राज्याचे लक्ष लावून आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करावा: प्रविण दरेकर

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!