राजकारण महाराष्ट्र

मुख्यमंत्री निर्णय घेतील; संजय राठोड राजीनाम्यावर खा. संजय राऊतांची प्रतिक्रीया

मुंबई -पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. मंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये राजीनामा दिलेले संजय राठोड हे पहिले मंत्री आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, परंतु संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोकं त्या विषयाशी संबधात निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत. अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तसेच शिवसेना आमदार, खासदार यांची नियमित बैठक आहे. त्यात मतदारसंघाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणीसोडून बाकी इतर विषय नाहीत, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही, मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या विषयावर बोलत आहेत, त्यामुळे सरकार भूमिका घेत नाहीत, असं कसं म्हणू शकतो असा प्रश्नही संजय राऊतयांनी विचारला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!