बीड

चौदा ग्रामपंचायत निवडीत नऊ ग्रा.पं.वर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, विरोधक पडले तोंडघशी, आ.संदिप क्षीरसागरांचे नऊ ग्रा.पं.वर वर्चस्व

नऊ ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंचांनी उधळला गुलाल


बीड (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच निवडणुक प्रक्रिया जाहिर झाली होती. यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर 24 ग्रामपंचायतसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर काहींनी आमच्या ग्रामपंचायती जास्त आल्या असा दावा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आज उघड झाले आहे. यातील 14 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांच्या निवडीची प्रक्रिया प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली. या चौदा ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायतींवर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे झाल्याने विरोधकांची झोप तर उडालीच मात्र ते तोंडघशी पडले असल्याची चर्चा बीड मतदार संघात होत आहे. बहिरवाडीचे सरपंचपदी बोबडे कल्पना जितेंद्र, उपसरपंचपदी डोईफोडे कौशल्या बबन, वासनवाडी सरपंच पदी गणेश भानुदास खोड, कारळवाडी-निर्मळवाडी सरपंच पदी शिवकन्या भानुदास हुंबे, उपसरपंच वर्षा विनय वाणी, काटवटवाडी सरपंच आशाबाई सिताराम खोड, नागझरी-मान्याचावाडा सरपंच चांगुबाई कृष्णा नैराळे, उपसरपंच सिंधुबाई कैलास येळवे, कळसंबर सरपंच सुशिला धोंडीबा तांगडे, उपसरपंच कर्नराज धर्मराज वाघमारे, वरवट-आहेरधानोरा मोनिका बाळासाहेब इंगोले, गुंधा व इतर ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

24 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यातील 14 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उसरपंच पदाची निवडणुक प्रक्रिया आज पार पडली आहे. या चौदातील 9 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला आहे. आमच्या ताब्यात जास्त ग्रामपंचायती आल्या असा दावा करणारे विरोधक मात्र तोंडघशी पडले असून आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात ग्रामपंचायतींवर वर्चस्व राष्ट्रवादी काँग्रेसचं कायम असल्याचं सिद्ध झालं आहे. बहिरवाडी, वासनवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, काटवटवाडी, नागझरी, कळसंबर, वरवटी, आहेर धानोरा, गुंधा व इतर ग्रामपंचायतींचे सरपंच, उसरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले असून त्यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा गुलाल उधळला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!