बीड

सुसाईड नोट, व्हिडिओ व्हायरल करून कोळगावचे मठाधिपती गायब; पोलिसांकडून शोध सुरु

बीड/ मादळमोही दि.०५ ( लोकाशा न्युज) : -गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ सुर्यमंदिर संस्थानवरील राहणा-या मठाधिपती महाराजांनी संस्थान शेजारीच वास्तव्यास असलेल्या एका पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग केला. यानंतर मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिला धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून सुर्यमंदिर संस्थानवरील महाराजाविरोधात बाल लैंगिक अत्याचार तसेच अँट्रासिटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंरतु दि.७ फेब्रुवारी रोजी सध्यांकाळी हानुमान महाराज यांनी सोशल मिडीयावर आत्महत्या करत आसल्याची सुसाईड नोट व व्हिडीओ व्हारलय केल्याने या प्रकारणाला वेगळेच वळण लागले. सुसाईड नोट व व्हडिओ मध्ये गुन्हा दाखल करण्या आगोदर मला पाच लाखाची मागणी करण्यात आली आसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांवातील संरपंच सह,पत्रकार काही नावे सुसाईड नोट व व्हडिओ हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली असुन सर्वत्र हा विषय चर्चेचा बनला आहे. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कल्याण – विशाखापट्टणम महामार्गालगत सुर्यमंदिर संस्थान आहे. या संस्थानवर मागील सात ते आठ वर्षापासून ह.भ.प.हनुमान महाराज हे मठाधिपती आहेत. तर पिडीत १५ वर्षीय मुलगी हि संस्थानलगतच शेतात आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. दरम्यान दि.३० रोजी मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून हनुमान महाराज यांनी घरात घुसून सदरील पिडीत मुलीला जवळ बोलावून तिच्या अंगावर वाईट हेतूने हात फिरवले. यानंतर मुलीने हात सोडा नाही तर घरच्यांना सांगेन म्हटल्यानंतर महाराज निघून गेले. यानंतर पुन्हा दि.३१ जानेवारी रोजी हनुमान महाराज यांनी सदरील मुलीचे वडील शेतात तर आई माहेराला गेल्याची संधी साधत घरात घुसून पुन्हा जवळ घेऊन तुला मी काल केलेला प्रकार आवडला का ? म्हणून विचारले, तेव्हा पिडीत मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता महाराजांनी हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान भितीपोटी हा प्रकार मुलीने वडिलांना सांगितले नाही. मात्र आई माहेराहून परतताच पिडीत मुलीने घडलेला प्रसंग हा आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याविषयी दि.०४ फेब्रुवारी २०२१ रोजी चकलांबा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून सुर्यमंदिर संस्थानवरील महाराज हनुमान महाराज यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार तसेच अँट्रासिटी अँक्टनुसार गुन्हा क्रमांक २८/२०२१ भादवि कलम ३५४ नुसार दाखल करण्यात आला आहे. या घटनेला तिन दिवस होताच हानुमान महाराज यांनी सध्याकाळी सहा वाजता सोशल मिडीयावर सुसाईड नोट मध्ये मला या प्रकरणी मुद्दाम आडकवले जात असुन गुन्हा दाखल होण्या आगोदार पाच लाखाची मागणी करण्यात आली होती, या प्रकरणात माझ्या व वारकरी संप्रदायाची मोठी बदनामी झाल्याने मी आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हारयल होताचा जिल्हात खळबळ उडाली असुन सुसाईड नोट व व्हिडीओ मध्ये फिर्यादी व भावकीतील कोळगांव संरपंच व भक्तगण यांची नावाचा उ्लेख केला आहे,त्यामुळे या घटने विषय जिल्हात खळबळ उडाली असुन वेगवेगळे तर्कवितर्क चर्चिले जात आहे.

सुर्य मंदिर संस्थानचे महाराज यांनी आत्महत्या करणार याविषयी व्हिडीओ व्हारयल होताचा जिल्हात खळबळ झाली. याविषयी चकलांबा पोलिस ठाण्यातील एपीआय विजय देशमुख सह इतर पोलिस यंत्रणा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण सुशाईट नोट आणि व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मोबाईल तात्काळ बंद झाला यामुळे शोध लागत नाही असे पोलिस यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!