बीड

आदित्यमधील स्थलांतरीत सर्व विभाग जिल्हा रुग्णालयात पुन्हा सुरू होणार ! आ.संदीप भैय्या क्षीरसागरांनी घेतला आढावा ; रूग्णसेवेत दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या दिल्या सूचना

बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : जिल्हा रुग्णालयात कोव्हिड 19 चे रुग्ण संख्या कमी होत असल्याने आदित्य येथील स्थलांतरित सर्व विभाग पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलवुन कोव्हिड 19 व सामान्य रुग्ण वेगवेगळे ठेवण्यात यावेत याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभागाचा आढावा घेतला. रूग्ण सेवेत दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना देत कोव्हिड 19 मध्ये काम करणार्‍या कर्मचारी यांचे कौतुक केले, कोविड 19 व सामान्य रुग्ण वेगवेगळे राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. बीड जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी गेल्या वर्षभरात कोरोनाच्या महाभीषण संकटात बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल होत होते. पुर्वी सुरू आसलेली ओपीडी व इतर बाह्यरुग्ण कक्ष व इतर विभाग आदित्य कॉलेज येथे सुरू करण्यात आले होते. आता कोव्हिड 19 चे रुग्ण कमी होत असल्याने जिल्हा रुग्णालयात सर्व विभाग सुरू करण्यात यावेत अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे शहरातील नागरिकांनाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गिते यांची भेट घेऊन ओपीडी व इतर बाह्यरुग्ण कक्ष जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात यावा जेणेकरून कोवीड-19 चे रूग्ण वेगळे राहतील याची दक्षता घेऊन जिल्ह्यातील रुग्णाची गैरसोय होणार नाही याचा आ. संदीप क्षीरसागर यांनी आढावा घेतला. यावेळी माझी आ.सयद सलीम, माजी आ.सुनील धांडे, सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई कुरेशी, नगरसेवक रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!