बीड

बाळापुर शिवारातील जुगार अड्ड्यावर एसपींच्या विशेष पथकाचा छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल, सहा लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त


बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या विशेष पथकाने बाळापुर शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड मारून आठ जुगार्‍यांवर नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहे. त्याचबरोबर जुगार्‍यांकडील सहा लाख 98 हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एपीआय विलास हजारे यांनी शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केली असून यामुळे जुगार खेळणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

बाळापुर शिवारात उत्तेश्‍वर किसन खिंडकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या विशेष पथकाला मिळाली होती, या माहितीची दखल घेवून एपीआय विलास हजारे यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्या जुगार अड्ड्यावर छापा मारला, या ठिकाणी जुगार खेळणार्‍या उत्तेश्‍वर किसन खिंडकर (वय 30 वर्षे रा. बंकटस्वामी गल्ली नेकनूर), नारायण बबन चौधरी (वय 30 रा. रोळसगाव ता.बीड), श्रीकृष्ण एकनाथ भागडे (वय 39 वर्षे रा. तांदळवाडीघाट ता.बीड), आनंदराव तात्याराव आमटे (वय 65 रा.अंजनवती ता.बीड), नवनाथ कोंडीबा पानतावणे (वय 60 वर्षे रा.रूटी ता.आष्टी), प्रविण बालासाहेब शिंदे (वय 36 वर्षे रा.बंकटस्वामी गल्ली नेकनूर), स.फय्याज स.महेमुद (वय 47 वर्षे रा.मुस्लीममोहल्ला ता.पाटोदा) आणि राजेंद्र चंद्रभान शिंदे (वय 47 वर्षे रा.कालीकानगर नेकनूर) या आठ जणांवर पोलिस कर्मचारी बापू राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यावेळी त्यांच्याकडील नगदी 47080 रूपयांची नगदी रोकड, वाहने 595000 रूपये व मोबाईल हॅन्डसेट किंमत 5600 रूपये असा एकूण सहा लाख 98 हजार 80 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान एपीआय विलास हजारे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणार्‍यांची धाबे दणाणली आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!