देश विदेश

महामार्गाच्या कामात टक्केवारी मागणे   येणार अंगलट, 22 आमदार अन् खासदारांची गडकरींनी थेट सीबीआयकडे केली तक्रार, टक्केवारी मागण्यात बीडच्या एका आमदाराचाही समावेश, जिल्ह्यात खळबळ


दिल्ली, दि. 24 (लोकाशा न्यूज) : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठेकेदारांवर दबाब टाकणार्‍या आमदार आणि खासदारांविरूध्द केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार केली आहे. यामध्ये बीडमधील एका आमदाराचा समावेश असल्याचे समोर येत आहे. यामुळे त्या आमदारासह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गडकरी यांनी सीबीआयच्या निदेशकांकडे जवळपास 22 नावांची यादी सोपवली असून या सर्वांविरूध्द कारवाई करण्यास सांगितले आहे. दस्तरखुद्द मंत्र्यांकडून तक्रार आल्याने सीबीआयकडून लवकरच या आमदार, खासदारांविरूध्द लवकरच कठोर पावले उचलली जाऊ शकतात, आपआपल्या मतदारसंघात काम करण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून टक्केवारीची अपेक्षा करणार्‍या तसेच त्यासाठी ठेकेदारांना त्रास देणार्‍या आमदार, खासदारांवर गडकरी कमालीचे नाराज आहेत. प्राप्त माहितीनुसार गडकरी यांनी सीबीआय निदेशकांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि हा सगळा विषय त्यांच्या पुढ्यात ठेवला. ठेकेदाराकडून आमदाराने, खासदाराने टक्केवारी मागणे म्हणजे रस्त्यांचा सत्यानाश आहे, जो प्रत्यक्ष काम करतो आहे, त्याचा नफा या घटकांच्या टक्केवारीमुळे कमी होतो, आणि रस्त्याच्या दर्जावर, गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होते, हे मला नको आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. दरम्यान औरंगाबाद येथील रस्त्याच्या संदर्भात एका ठेकेदाराशी झालेल्या बोलण्यातून हा विषय गडकरी यांच्यासमोर आला. बीड जिल्ह्यातील एका आमदारासह विदर्भ, मराठवाडा, पुणे तसेच कोकण विभागातील आमदारांची नावे या यादीत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. सदर आमदार गडकरींच्या भेटीला गेल्याचेही आता सांगितले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!