शेती

शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा

शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत दाखल झालं आहे. आज आझाद मैदानात किसान मोर्चाची (Kisan Morcha) भव्य सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar will address farmer)  सहभागी होणार आहेत. तसेच आज आंदोलक राज्यपालांची भेट घेऊन कृषी कायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. 

मुंबईत धडक दिलेल्या किसान मोर्चाची आज भव्य सभा होणार आहे. आझाद मैदानात होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात ठिय्या दिला आहे. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकरी ‘चलो राजभवन’ म्हणत राजभवनाकडे कूच करणार आहेत. किसान मोर्चाचे प्रतिनिधी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कृषिकायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात हा मोर्चा आहे.

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल होत आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत रॅली काढत आहेत. शनिवारी रात्री नाशिकहून सुरू झालेली ही रॅली आज मुंबईत पोहोचत आहे.

ते मुंबईतील आझाद मैदानात सभा घेतील. यानंतर ते आझाद मैदान ते राजभवनापर्यंत कृषी कायद्याविरूद्ध मोर्चा काढतील. ज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सामिल होऊ शकतात.

अखिल भारतीय किसान सभेने ही रॅली आयोजित केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक निवेदनही देणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) महाराष्ट्र शाखेने दावा केला आहे की नाशिकमधील सुमारे 15,000 शेतकरी शनिवारी टॅम्पो, पायी व इतर वाहनांनी मुंबईला रवाना झाले आहेत.

ड्रोनवरुन ठेवली जात आहे नजर
शेतकरी रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षिण मुंबई येथील आझाज मैदान आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसराच्या सुरक्षेची विशेष तयारी केली आहे. त्याशिवाय राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) चे जवान तैनात केले आहेत. या मोर्चावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

असा होता शेतकऱ्यांचा 180 किलोमीटरचा प्रवास
AIKS नुसार, मुंबईसाठी कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्री आरामासाठी इगतपुरीजवळच्या घाटनदेवी येथे मुक्काम केला. रविवारी सकाळी शेतकरी कसारा घाटाच्या रस्त्याने मुंबईसाठी रवाना झाले. कसारा घाटापर्यंत काढलेल्या सात किलोमीटर लांब मोर्चामध्ये महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. हा मोर्चा सकाळी नऊ वाजता सुरू झाला आणि 11:30 वाजता संपला. नंतर शेतकरी वाहनांच्या माध्यमातून पुढील प्रवासाला निघाले.

कसारा घाट मोर्चाचे नेतृत्व एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, प्रदेश युनिटचे प्रमुख किसन गुजर व सरचिटणीस अजित नवले यांनी केले. इंडियन ट्रेड युनियन सेंटरशी संबंधित इगतपुरी आणि शाहपूर तहसील कारखानदारांनी (सीआयटीयू) या शेतकर्‍यांचे फुलांचे वर्षाव करुन स्वागत केले.

पवार यांनी केंद्राला दिला होता इशारा
कडाक्याच्या हिवाळ्यात दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला की, जर ते शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. ते म्हणाले होते की सरकारने शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.

error: Content is protected !!