शेती

आमच्या हातात दगड आणि तुमच्या काचा; कृषी विधेयकांवरुन राजू शेट्टी आक्रमक

​​काल राज्यसभेत कृषी क्षेत्राशी संबंधीत विधेयक मंजूर झाले. या विधेयकांना विरोध केला जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ट्विट करुन या विधेयकांवर टीका केली आहे. ​पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल. पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत, असा इशारा राजू शेट्टी यांनी ट्विटमधून दिला आहे.

​ कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधेयकं अखेर काल राज्यसभेत मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंद गदारोळ घातला पण आवाजी मताद्वारे दोन्ही विधेयकांना मंजुरी देण्यात आली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल सातवा दिवस होता. सरकारने कृषी संबंधित विधेयकं राज्यसभेत मांडली. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयके सादर केली. नरेंद्रसिंह तोमर यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. खासदारांनी उसभापतीच्या निर्णयावरुन गदारोळ निर्माण केला. वास्तविक, सभागृहाचे कामकाज दुपारी १ वाजता पूर्ण केली जाणार होती. हे विधेयक मंजूर होईपर्यंत उपाध्यक्षांनी कामकाजाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यावर विरोधी पक्षातील खासदारांनी गदारोळ सुरू केला. खासदारांनी नियमावलीचं पुस्तक फाडून ते उपसभातींच्या दिशेने भिरकावले.

error: Content is protected !!