मराठवाडा

ओबीसी मेळाव्यात गोपीनाथराव मुंडेंचा गजर, मंत्री वडेट्टीवारांनी आठवण काढताच टाळ्यांचा पाऊस, नावाचा जयघोष


अंबाजोगाई, दि. 24 (लोकाशा न्यूज) : ज्या स्व.गोपीनाथराव मुंडेनी आपल संपूर्ण राजकिय आयुष्य राज्यातील तथा देशातील आठरा पगड जाती धर्माच्या कल्याणा साठी घालवले , वंचित , उपेक्षित दुर्लक्षित लोकांचा आवाज बनून देशाची संसद गाजवली त्या मुंडे साहेबांची आठवण काल जालन्यात ओबीसीच्या मेळाव्यात मंत्री वडेट्टीवारांना झाली , साहेबांना सलाम करताच टाळ्यांचा कडकडाट आणि साहेबांच्या नावाचा उदघोष थांबता थांबेना , आठवण काढताच उपस्थीतांना डोळ्यातले आश्रु रोखता आले नाही . भाजपा नेत्या पंकजा ताईनी तर संसंदेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शिअर केला तो दिवशभर गाजला
मुंडे आणि ओबीसी समाज हे ऐकेकाळी राज्यात एकरूप चित्र होत , या समाजाच्या कल्याणा साठी त्यांनी आपल आयुष्य घालवल , राज्यात आणि देशात चांगली फळी निर्मान केली होती .ओबीसी च्या हक्कासाठी त्यांनी केलेला संघर्ष , राबवलेली चळवळ जिवंत आहे , साताधारी पक्षावर दबाव निर्माण करून राज्यात देशात अनेक प्रश्न मार्गी लावले , राजकिय , सामाजिक प्रतिष्ठा त्यांनी मिळून दिली , मंत्री छगन भुजबळ , मंत्री रामदास आठवले , नाना पटोले आदी नेत्यांना सोबत घेवून वज्र मुठ बांधली . ओबीसीची जात गणना देशात कुरुन जातनिहाय जणगणना करावी आशी मागणी संसंदेत केली त्या काळात भाषण गुपच गाजले होते . त्यांचा सक्षम वारसा पंकजा ताई पुढे चालवत असून त्यांनी पण जनगणना करावी आशी मागणी केली काल जालन्यात या समाजाचा मोठा मेळावा संपन्न झाला , तिथे साहेबांची आठवण मंत्री महोदयांना झाली , गोपीनाथराव मुंडे यांच नाव घेवून त्यांच्या संघर्षाला सलाम म्हणताच चक्रीवादळाप्रमाणे मैदाणावर टाळ्यांचा कडकडाट झाला , मुसळधार पावसाच्या थेंबा प्रमाणे टाळया चां आवाज आणि नावाचा जयजयकार थांबला नाही , मंत्री वडेट्टीवारांना भाषण करता आले नाही साहेबांची आठवण काढली , चेहरा लोकांना डोळ्यासमोर दिशला लोकांना आश्रु रोखता आले नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!