महाराष्ट्र

आम्हीही याच देशाचे, आमचीही गणती करा, पंकजाताईंची मागणी, मुंडे साहेबांचा व्हिडीओ केला ट्विट

मुंबई: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच आता भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली. (Pankaja Munde demands OBC counting in census)
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीसोबत पंकजताईंनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’, अशी कॅप्शन लिहली आहे. त्यामुळे आगामी काळात ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान खासदार प्रीतमताईंनीही ओबीसी जनगणनेचा मुद्दा मागच्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडला होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!