महाराष्ट्र

आळंदीत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या नावाने साधक आश्रमाची स्थापना,…तर संस्थेतून चांगली आणि राजकारण विरहित पिढी घडावी- खा. प्रीतमताई, ताईंच्या हस्ते साधक आश्रमाचे झाले भुमिपुजन



बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : ज्ञानेश्वर अनुष्ठान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित लोकनेते गोपीनाथराव मुंडे साधक आश्रमाचे भूमिपूजन शनिवारी  खा. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते श्री क्षेत्र आळंदी येथे करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने साधक आश्रमाची स्थापना ही संकल्पना वेगळी आणि आनंददायी आहे, म्हणूनच ही संकल्पना मनाला स्पर्शून गेली. या साधक आश्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी दाखल होणारे विद्यार्थी संस्थेच्या लौकिकामध्ये वाढ करणारे असावेत, तसेच संस्थेच्या माध्यमातून चांगली आणि राजकारण विरहित पिढी घडावी, अशा सदिच्छा यावेळी खा. प्रीतमताईंनी व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती, विशेष म्हणजे साहेबांची लेक आळंदीत येणार असल्यामुळे मागच्या आठ दिवसांपासून या कार्यक्रमाला जाण्यासाठी अनेकांनी तयारी केली होती, त्यानुसार कालचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला, भविष्यात या साधक आश्रमातून चांगली आणि राजकारण विरहित पिढी घडेल असा विश्‍वासही आता व्यक्त केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!