बीड दि. १४:–जिल्ह्यातील मुगगाव तालुका पाटोदा येथे दिनांक 07 जानेवारी 2021 रोजी ।। कावळे मृत स्थितीत आढळून आले. त्यापैकी 3 कावळयांचे शव रोग निदानासाठी, रोग अन्वेषण विभाग, पुणे मार्फत NIHSAD, भोपाळ येथे पाठविण्यात आले होते.
सदर नमुने बर्ड फ्लू (HSN8) पॉझिटिव्ह आले आहे. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे
निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये कावळ्यांच्या मृत्यू यावत भितीचे वातावरण निर्माण होवू नये आपल्या भागात किंवा कावळे मृत पावल्यास घाबरून जावू नये. सदरील मृत कावळे आढळून आल्यास ग्रामपंचायत नगरपंचायत यांचेशी व नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा. मृत कावळ्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नये. मास्क वापरावा. तसेच सदरील भाग
धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निजंतूकिकरण करुन घ्यावा, कावळ्यांमध्ये जास्त प्रमाणात असाधारण मृत्यू आढळल्यास रोग निदानासाठी त्यांचे नमुने पाठविण्यात येतील, बीड जिल्ह्यात अद्यापपर्यंत पाळीव पक्षांमध्ये बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. याची नोंद घ्यावी व अफयांना बळी पडू नये असे आवाहन राहुल रेखावार,जिल्हाधिकारी,बीड यांनी केले आहे .
०००००