बीड माजलगाव

ट्रँक्टर उलटल्याने उसाखाली दबून 25 मेंढ्यांचा मृत्यु; माजलगाव तालुक्यातील घटना

माजलगाव : जयमहेश साखर कारखान्याकडे जाणारे एक ट्रँक्टर अचानक उलटल्याने उसाखाली दबून 20 ते 25 मेंढ्या दगावल्याची घटना गुरुवार दि.14 जानेवारी रोजी  दुपारी साडेचार वाजता घडली. माजलगाव शहरापासून जवळच परभणी रोडवरील घळाटवाडी फाटा येथे हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव शहराकडून जय महेश कारखान्याकडे एक डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होते. परभणी रोडवर हे ट्रॅक्टर अचानक उलटले. यावेळी रस्त्याच्या बाजूने माजलगावकडे जाणार्‍या 20 ते 25 मेंढ्यां ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दबलेल्या मेंढ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. 20 ते 25 मेंढ्या एकाचवेळी दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!